How To Earn Money From Youtube in Marathi | YouTube वरून पैसे कसे कमवायचे
एखाद्या युट्युब चॅनेल वरून पैसे कमवायला सुरवात कशी करायची ? त्यासाठी तुम्हाला youtube चा पार्टनर प्रोग्रॅम
Youtube Partner Program युट्युबर्सला पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देतो.
हा प्रोग्रॅम जॉईन करण्यासाठी तुम्हाला २ गोष्टी पूर्ण करावे लागतात -
१२ महिन्यात तुम्हाला पूर्ण करायचे आहेत -
१) १००० subscribers
२) ४००० तासांचा वॉचटाइम -
वॉचटाईम म्हणजे काय ?- समजा तुमच्या चॅनेल वर १० विडिओ आहेत आणि प्रत्येक व्हिडिओला १०० views मिळाले आहेत, तर तुमच्या चॅनेलवर एकूण १००० views झाले. समजा प्रत्येक व्यक्तीने तुमचे विडिओ एका मिनिटासाठी पहिले, तर तुमचा एकूण वॉचटाईम १००० मिनिट झाला
वॉचटाईम कुठे पहायचा ? - YT studio अँप उघडल्यावर समोर तुम्हाला मागच्या २८ दिवसांचा watchtime दिसेल. (हा वॉचटाईम तासांमध्ये आहे )
खालील विडिओ प्रमाणे तुम्ही मागील १२ महिन्यांचा वॉचटाईम पाहू शकता .
एकदा तुम्ही वरील क्रायटेरिया पूर्ण केला कि मग तुम्ही तुमच्या चॅनेलला review साठी पाठवू शकता.
तुमच्या चॅनेलचा review साधारण एका आठवड्यात पूर्ण होईल आणि मग तुम्हाला ई-मेल येईल कि तुमचा चॅनेल partner program साठी स्वीकारला गेला आहे कि नाही.
चॅनेल review करताना कोण-कोणत्या गोष्टी बघितल्या जातात ?
- Main theme - चॅनेल कोणत्या विषयावर आहे.
- Most viewed videos - चॅनेल वरील सर्वात जास्त views वाले विडिओ कसे आहेत व त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी promote केल्या आहेत का
- Newest videos - चॅनेल वर शेवटचे अपलोड केलेले विडिओ कसे आहेत.
- Biggest proportion of watch time - सर्वात जास्त वॉचटाईम कोण-कोणत्या विडिओ मधून आलाय ?
- Video metadata (including titles, thumbnails, and descriptions) - विडिओच्या title ,thumbnail , description मध्ये काही चुकीचे शब्द वापरले आहेत कि नाही.
चुकीचे शब्द (रातोरात पैसे कमवा , शिव्या-शाप, एखाद्या व्यक्तीची personal माहिती त्याच्या सम्मती शिवाय, अश्या website चे link जे बॅन झाले आहेत )
Comments
Post a Comment